सेवाग्राम कंपनी एक प्राहिव्हेट कंपनीच नसून एक समाज सेवेचे माध्यम आहे, कंपनीचे सर्व पदाधिकारी हे खेडेगावातील असल्यामुळे आताच्या आधुनिक युगात खेडेगावात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
सेवाग्राम कंपनी ची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात वस्तू व सेवा यांनी जाहिरात करणे आणि ग्राहकांच्या मागणी नुसार उत्पादक कंपनीच्या अटीशर्ती लक्षात घेऊन वस्तू विक्री करणे.सेवाग्राम ही एक प्राहिव्हेट कंपनीच नसून एक समाज सेवेचे माध्यम आहे, कंपनीचे सर्व पदाधिकारी हे खेडेगावातील असल्यामुळे आताच्या आधुनिक युगात खेडेगावात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.आज प्रत्येक गावात 50 ते 60 टक्के लोक smartphone वापरतात व माहितीची देवाण घेवाण करण्यासठी whatsapp चा वापर केला जातो, तरी देखील अनेक वस्तू व सेवांची माहिती ग्रामिण भागातील लोकांपर्यंत पोहचत नाही, किंवा त्यांना ती समजत नाही, याउलट शहरी भागात प्रत्येक वस्तू व सेवा काही क्षणात मागणी नुसार उपलब्ध होत असतात ही जी शहर आणि खेडे यांच्यात दरी निर्माण झाली आहे ती भरण्याचे महत्वपूर्ण काम सेवाग्राम कंपनी मार्फत करण्यात येणार.
डिजिटल इंडिया चे स्वप्न फक्त शहरांचा विकास केल्याने साध्य होणार नाही त्यासाठी खेडे गावाचा विकास होणे गरजेचे आहे, सेवाग्राम कंपनी मराठी तरुणांनी स्वयं स्फुर्तीने खास करून ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहावी या हेतूने सुरू केली असून ग्रामीण भागातील तरुन तरुणींना हक्काचं एक ऑनलाईन दुकान उपलब्ध करुंन देण्याचा कंपनी प्रयत्न करेल. लोकांच्या मागणीनुसार त्यांना अटी शर्ती लक्षात घेऊन विविध वस्तू व सेवा पोहचविल्या जातील.त्यासाठी गावातील लोकसंखेनुसार तरुण तरुणींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न कंपनीचा राहील. त्याचप्रकारे सेवाग्राम कंपनी स्थापन करण्यामागचा महत्वपूर्ण उद्देश असा की,जी युवाशक्ती आज सोशलमीडिया मुळे लोकसहवासातून दुरावत चालली आहे अशा युवशक्तीला समाजसेवेचा एक प्लॅटफॉर्म आमच्या मार्फत सोशल मीडिया चा उपयोग करूनच तयार करण्याचा प्रयत्न आहे. आज अनेक असे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ज्यांनी व्यवसाय चालू केला मात्र त्याची माहिती स्पर्धेच्या युगात कोणाला समजत नाही परिणामी असे व्यवसाय बंद करण्याची वेळ अशा छोट्या व्यावसायिक लोकांवर आली आहे. म्हणूनच अशा लहान मोठ्या व्यवसायांची जाहिरात कमी खर्चात उत्तमरीत्या लोकांपर्येंत पोहच केली जाईल. यामुळे जो जाहिरातीचा अतिरिक्त खर्च येत होता तोदेखील कमी करता येणार.तसेच सेवाग्राम कंपनी मार्फत खास करून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आमच्या वेबसाईटवर सेवा म्हनून माहिती टाकन्यात आली आहे ज्यामध्ये कंपनी नियमानुसार अल्प फी भरून स्वताच ragistration तरुण तरुणी करू शकतात ज्यामध्ये प्रत्येकात जे काही उपजत गुण असतील त्यांचा उल्लेख करण्यात यावा जेणेकरून त्यांच्या सभोवतालच्या परिसरात जर काही काम उपलब्ध असेल तर कंपनी मार्फत त्याची माहिती कंपनीत नाव रजिस्टर केलेल्या प्रतिनिधीला देण्यात येणार यामुळे एक रोजगार तर उपलब्ध होईलच त्याबरोबर लोकांच्या गरजा क्षणात पूर्ण होण्यास मदत होईल.सेवाग्राम च्या साईट ला जे भेट देतील त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपली कंपनी कशी उपयुक्त असेल याचा प्रयत्न आमच्या कडून नेहमीच करण्यात येणार.
सेवाग्राम कंपनी ही एक रजिस्टर कंपनी असून कोणतीही फसवणूक ग्राहकांची होणार नाही याची पूर्ण हमी कंपनीतर्फे देण्यात येते.








